कर्जत :
राज्यामध्ये गाजलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील ‘निर्भया’ अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या भावाला शासनाच्या वतीने महसूल खात्यामध्ये शिपाई म्हणून नोकरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिकाराचा वापर करीत ही नोकरी दिली असून, कर्जत येथील तहसील कार्यालयामध्ये तो शुक्रवारी (दि.11) रूजू झाला आहे.
कोपर्डी येथे 13 जुलै 2016 या दिवशी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी अत्याचार आणि निर्घृण खुनाची घटना घडली होती. खेळाडू असलेल्या शाळकरी अल्पवयील मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार करून तिचा खून केला होता. या घटनेमुळे राज्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने लाखोंचे मोर्चे निघाले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथील भेटीमध्ये घटनेतील पीडित कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता करीत पीडितेच्या भावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिकाराचा वापर करीत, महसूल विभागामध्ये शिपाई पदावर कायम स्वरूपी नेमणूक केली आहे. तसे लेखीपत्र त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाठविले. ते पीडितेच्या कुटुंबीयांना 10 जानेवारी रोजी मिळाले. त्यानुसार शुक्रवारी (दि.11) पीडितेचा भाऊ कर्जत तहसील कार्यालयामध्ये नोकरीवर हजर झाला असून, त्यास तहसीलदार किरण सांवत यांनी रूजू करून घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला
राज्याचे मुख्यमत्री देवेद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे त्यांच्यामुळे माझ्या मुलास शासकीय नोकरी मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत, अशी भावना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
नराधमांना तातडीने फाशी द्यावी
पीडितेची आई म्हणाली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरीचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मात्र, ज्या नराधमांनी हे कृत्य केले, त्या सर्वांना फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून तातडीने फाशी देऊन माझ्या मुलीच्या आत्म्यास शांती द्यावी.

Post a Comment