0
नवी दिल्ली : 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हरियाणातील जिंद आणि राजस्थानमधील रामगड येथील विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी आज, सोमवारी (दि.२८) मतदान होत आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या दोन्ही जागांचे निकाल ३१ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत.


जिंदचे आमदार डॉ. हरिचंद्र मिढा यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. येथे काँग्रेसने रणदीप सिंह सुरजेवाला यांना तर भाजपने हरिचंद्र यांचे पूत्र कृष्ण मिढा यांना उमेदवार म्हणून रिंगणात उभे केले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थाननंतर काँग्रेसला आपला विजयी रथ कायम ठेवायचा आहे. त्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांना मैदानात उतरवले आहे.

तर राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच बीएसपीचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाले होते. येथील पोटनिवडणुकीत बीएसपीने जगत सिंह, काँग्रेसने शफिया जुबैर खान आणि भाजपने सुखवंत सिंह यांना उमेदवारी दिली आहे. राजस्थानमध्ये नुकतेच काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. काँग्रेसने ९९ जिंकल्या आहेत. त्यांना १००  हा बहुमत गाठण्यासाठी १ जागा अजून हवी आहे. त्यासाठी काँग्रेससाठी ही पोटनिवडणूक महत्वाची आहे.


Post a comment

 
Top