0
राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची केली होती हॅट्ट्रिक

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवार रोजी सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

१ सप्टेंबर १९३५ रोजी सांगली जिल्ह्यात शिवाजीराव देशमुख यांचा जन्म झाला. शिवाजीराव १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यापू्र्वी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची देशमुख यांनी हॅट्ट्रिक केली होती. काँग्रेस पक्षाच्या संघटनेतही त्यांनी महत्वाची पदे भुषवली होती. एक संयमी नेता आणि चांगला मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती.

Post a Comment

 
Top