0
यापूर्वी बाबा रामदेव यांनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर सुद्धा उपाय सूचवला होता.

नवी दिल्ली - योग गुरू बाबा रामदेव यांनी एखादा भारतरत्न संन्यासीला का दिला जात नाही असा सवाल उपस्थित केला आहे. बाबा रामदेव म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही संन्यासीला हा सर्वोच्च सन्मान मिळाला नाही, हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा शिवकुमार स्वामी. मी केंद्र सरकारला आवाहन करतो, की पुढच्या वर्षी याचा विचार करून भारतरत्न संन्यासीला सुद्धा द्यावा.- बाबा रामदेव गेल्या महिन्यातच मतदानाच्या अधिकारावर बोलून चर्चेत होते. दोनहून अधिक अपत्ये असलेल्या नागरिकांकडून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात यावा. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडून सरकारी शाळा, सरकारी रुग्णालये, सरकारी नोकरी किंवा शासनाच्या कुठल्याही सुविधेचा लाभ दिला जाऊ नये. असे केल्यास देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा बसेल असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले होते. 
- सोबतच राम मंदिर आणि अयोध्या वादावर सुद्धा त्यांनी सरकारला सल्ला दिला होता. अयोध्येत योग्य वेळी राम मंदिर बांधले नाही तर लोकांचा भाजपवरून विश्वास उठेल. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सुद्धा भाजपची सत्ता आहे. तरीही सरकार राम मंदिर बांधत नसेल तर सरकारवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असेही बाबा रामदेव म्हणाले आहेत.Next Bharat Ratna should be given to A Saint, Baba Ramdev demands government

Post a comment

 
Top