0
शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथील कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर आली. आज, रविवारी सकाळी हा प्रकार घडला.जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. गेल्या आठ दिवसांपासून या बैठकीची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांचा विरोध होता. सकाळी  बैठक सुरू झाल्याने काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येत भिंडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

Post a Comment

 
Top