0
मागील वेळी जवळ पैसे नसल्याने परतले होते दोघे प्रेमवीर

नगर : आईचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून तरुणी प्रियकरासोबत फरार झाली आहे. नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर भागात हा प्रकार घडला. दाेघे यापूर्वी देखील फरार झाले होते. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी व तिचा प्रियकर सागर गणेश शिंदे याच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


घराशेजारीच राहणाऱ्या सागर शिंदे याच्या प्रेमात पडलेली तरुणी काही दिवसांपूर्वीच त्याच्याबरोबर पळून गेली होती. परंतु खर्चाच्या टंचाईमुळे हे दोघे तीन-चार दिवसांत पुन्हा घरी परतले. ही घटना घडून महिना उलटत तोच दोघे पुन्हा फरार झाले. १४ जानेवारीला दोघेही फरार झाल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आले. मुलीने जाताना तिच्या आईचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून सागर याच्यासह पोबारा केला. चार-पाच दिवस सर्वत्र शोध घेऊनही मुलीचा तपास लागला नाही. त्यामुळे तिच्या आईने कोतवाली पोलिस ठाणे गाठत मुलगी व तिचा प्रियकर सागर याच्या विरोधात फिर्याद दिली. दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वेळी जवळ पैसे नसल्याने दोघे प्रेमवीर परत आले हाेते. या वेळी मात्र त्यांच्याकडे लाखोंचा ऐवज आहे. त्यामुळे त्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

The girl took her mothers jewelry, cash and go away with boyfriend


Post a Comment

 
Top