महाड :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या संदर्भात केलेल्या बेछूट आरोपांच्या विरोधात महाडमधील शिवसैनिकांनी मंगळवारी (दि.१५) निलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन केले. छत्रपती शिवाजी चौकात राणे यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना जिल्हा युवा सेनाधिकारी विकासशेठ गोगावले यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. या घटनेची किमान जाणीव निलेश राणे यांनी ठेवणे गरजेचे होते. यापुढे असेच वक्तव्य करीत राहिल्यास नारायण राणेंसह निलेश राणे यांना रायगड जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा विकास गोगावले यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने हजर होते.

Post a Comment