नवी दिल्ली :
क्रिकेट जगतात कालानुरुप बरेच बदल होत गेले आहेत. सुरुवातीच्या काळात या खेळात फलंदाज आणि गोलंदाज दोघेही वर्चस्व राखायचे. पण कालांतराने हा खेळ फलंदाजांना झुकते माप देणारा होत गेला. अकुंचन पावत असलेल्या सीमारेषा, वाढत गेलेली बॅटची कडा, बदललेले खेळाचे स्वरुप यामुळे चौकार आणि षटकारांना फार महत्व आले आहे. त्यात टी-२० चा झालेला उदय यामुळे तर आता षटकारांचे मीटरच सुरु झाले आहे. किती उंच, किती लांब याची उत्सुकता अधिक असते. पण, तुम्हाला माहित आहे का क्रिकेटच्या इतिहासात पहिला षटकार कधी मारला गेला आणि कोणी मारला?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या उद्या ॲडलेड ओव्हलवर दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. याच मैदानावर १८९८ मध्ये इंग्लंड आणि आस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना झाला होता. याच सामन्यात क्रिकेट इतिहासातील पहिला षटकार मारला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या जो डारलिंग यांनी हा षटकार मारण्याचा मान पटकावला होता. या डावखुऱ्या फलंदाजाने लिलया चेंडू मैदानाबाहेर मारला होता. पण, त्याकाळी चेंडू थेट मैदानाबाहेर मारल्यावर ५ धावाच मिळत होत्या. त्यामुळे याला षटकार म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही.
जो डारलिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपदही भुषवले होते. त्यांनी २१ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. डार्लिंग यांनी एकूण ३४ कसोटी सामने खेळले. ६० कसोटी डावात त्यांनी २८.६ च्या सरासरीने १६५७ धावा केल्या. यात तीन शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत भारताचा ३४ धावांनी पराभव करत आपला हजारावा विजय संपादन केला होता. तसेच पहिला षटकार मारण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्यात खेळाडूच्या नावावर आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटमधील योगदान या खेळाला समृध्द करणारे आहे.

Post a Comment