घटनास्थळावर सुसाइड नोट सापडली आहे. त्यात लाड यांनी ताहिर भाई आणि एका बिल्डरवर गंभीर आरोप केले आहे.
मुंबई-मराठी चित्रपट निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सदस्य सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी बुधवारी (ता.16) आत्महत्या केली. लाड यांचा मृतदेह दक्षिण मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील एका मंदिरात आढळून आला.
सुसाइड नोट सापडली..पोलिस सुत्रांनुसार, सदानंद लाड याचा मृतदेह बुधवारी सकाळी एमएस अली रोड वरील लंदनचा गणपती मंदिरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळावर सुसाइड नोट सापडली आहे. त्यात लाड यांनी ताहिर भाई आणि एका बिल्डरवर गंभीर आरोप केले आहे.
गुन्हा दाखल.. सदानंद लाड यांनी एलजी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. लाड यांचा मुलगा अंकुर लाड याने दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 306 नुसार (आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment