आगामी वर्ल्डकपची पूर्वतयारी म्हणून, ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्याकडे पाहिले जाते. ही मालिका आणि त्यानंतरचा न्यूझीलंड दौरा यात भारतीय संघ फलंदाजीचा क्रम लावण्याची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने ९६ चेंडूवर केवळ ५१ धावा काढल्या. त्याच्या संत खेळीमुळे त्याच्या फलंदाजीवर पुन्हा प्रश्न उभारला जात आहे.
मात्र हिट मॅन ठरलेल्या रोहितने धोनीची बाजू सावरली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदमध्ये बोलताना रोहित म्हणाला, चौथ्या नंबरच्या फलंदाजीसाठी धोनी योग्य आहे. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र याचा निर्णय प्रशिक्षक आणि कर्णधार घेतील.
गेल्या वर्षभरापासून फलंदाजीचे चाैथे स्थान धोक्यात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना रोहित म्हणाला, की फलंदाजासाठी धोनीचे स्थान चौथे असणे संघासाठी फायद्याचे ठरणार आहे. सध्या या स्थानावर अंबाती रायडू खेळत आहे. तो चांगले प्रदर्शन करत आहे. असे असले तरी कर्णधार आणि प्रशिक्षक याबद्दल काय विचार करतात यावर ते अवलंबून आहे. पण यासंदर्भात माझे वैयक्तिक मत विचारलात तर धोनीला चौथे स्थान मिळवून देण्यात मला आंनद आहे. याआधी विराट कोहलीने चौथ्या स्थानासाठी अंबाती रायडूला पसंती दर्शवली आहे.

Post a Comment