0
निलेश यांनी बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांवर शिवसेना किंवा ठाकरे कुटुंबाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुंबई- राज्याचे माजी मुख्‍यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी गायक सोनू निगम याच्या हत्‍येचा कट रचला होता, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. एवढेच नाही तर शिवसेना नेता आनंद दिघे यांच्या मृत्यूला बाळासाहेबच जबाबदार होते, असा सनसनाटी आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. निलेश यांनी बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांवर शिवसेना किंवा ठाकरे कुटुंबाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

निलेश राणे हे मंगळवारी (ता.15) रत्‍नागिरीत होते. ते म्हणले, 'सोनू निगमच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. हे मुंबई पोलिसांना माहीत होते. सोनू निगमला मारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक पाठवले होते.'

आनंद दिघे यांच्या हत्येला जबाबदार..
निलेश राणे म्हणाले, 'आनंद दिघे यांचे काय झाले. आनंद दिघे हे एक शिवसैनिक होते. त्याच्या हत्येचे आदेश खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. हे प्रकरण कसे दाबण्यात आले?'

शिवसेना खासदाराने नारायण राणेंवर केले होते हे आरोप
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राऊत म्हणाले होते की, नारायण राणे यांची 10 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नऊ जणांची हत्या केली होती. नारायण राणे यांच्या हिंमत असेल तर त्यांनी यावर स्प‍ष्टीकरण द्यावे. दरम्यान, विनायक राऊत यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव केला होता.Farmer MP Nilesh Rane makes explosive allegations against Balasaheb Thackeray

Post a Comment

 
Top