0
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतल्या नंतर रोहित शर्माने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुंबई - टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला चार दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे ही आनंदवार्ता कळाली तेव्हा रोहित मिशन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात आले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतल्यावर रोहित शर्माने आपल्या मुलीचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोत मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. फोटोत रोहित शर्मा आणि रितिकाचा हात दिसत असून मुलीने त्यांचं बोट पकडलेले दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती. लवकरच, मी बाप  होणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रोहितने सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो केला शेअर केल्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गोड बातमी! हिटमॅन रोहित बनला 'बाप'माणूस, शर्मा कुटुंबीयांना 'कन्यारत्न' 
Rohit Sharma shares first glimpse of his newborn daughter | रोहितने सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो केला शेअर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Post a Comment

 
Top