0
कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई - मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बिघाडामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. डोंबिवली, कल्याण स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे. अप मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू असून रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळी सुरू आहे.  Delays on Central Railway due to track fractures between Kurla-sion station | मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, कुर्ला-सायनदरम्यान रेल्वे रूळाला तडा

Post a Comment

 
Top