मुंबई :
शेतकर्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे तसेच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल अशी व्यवस्था उभारण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहेत. शेतीसाठी शाश्वत वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्यात लवकरच एक लाख सौर ऊर्जा पंप वाटपास करण्यात येणार असून राज्यात लवकरच शेतकर्यांना 12 तास वीज मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमात बोलताना सांगितले.

शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा राज्यातील शेतकर्यांनी लोकसंवाद कार्यक्रमात मांडल्या. सुमारे तीन तास चाललले या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पालघर जिल्ह्यातील गणपत गावंडा यांनी दुर्गम भागातील शेतीच्या सपाटीकरणाबाबत अडचण सांगितली. त्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, 2022 पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचे ध्येय निश्चित आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून आतापर्यंत सुमारे 51 लाख खातेदार शेतकर्यांसाठी 24 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 2014-15 पासून आतापर्यंत राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकरी बांधवाना 15 हजार 240 कोटी रुपये वाटप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांना आवडतो हातसडी तांदळाचा भात
पालघर जिल्ह्यातील शेतकर्यांशी चर्चा करताना शेतकरी आपल्या भागातील चिकू, नारळ, पपई, पेरु या फळांसोबतच विविध भाज्या आणि फुलांची माहिती देत होते. माझ्या घरी पालघर जिल्ह्यात पिकणारा हातसडीचा तांदूळ मी नेहमी आणतो.

Post a Comment