0
नवी दिल्ली :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय महाअधिवेशन शुक्रवार  (दि.११) पासून दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरू होत आहे. या अधिवेशनात देशभरातील सुमारे १२ हजार भाजप नेते, आमदार, खासदार सहभागी होणार आहे. या अधिवेशनात केंद्रात नरेंद्र  मोदी सरकार पुन्हा कसे सत्तेत आणता येईल, यावर रणनिती ठरविली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनाच्या उद्घघाटनाला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार आहेत. तर समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिवेशनात राम मंदिर, बेरोजगारी, सवर्णांना जाहीर केलेले आरक्षण हे प्रमुख मुद्दे असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, प्रचारतंत्र, सोशल मीडिया आदी मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात आगामी निवडणूक या मुद्यावर अधिक विशेष फोकस असणार आहे. विविध राज्यांतील भाजप नेते पक्षाच्या रणनितीवर चर्चा करणार असल्याचे समजते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. त्यानंतर केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.

Post a Comment

 
Top