0
नवी दिल्‍ली :

राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची मुलगी खासदार मीसा यादव यांनी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांच्‍याबाबतीत एक वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे मीसा यादव चर्चेत आल्‍या आहेत.


पटनाजवळील विक्रम भागामध्‍ये १६ जानेवारीला एक सभा आयोजित करण्‍यात आली होती. या सभेत खासदार मीसा यादव म्‍हणाल्‍या, 'जेव्‍हा मला माहिती मिळाली की, राम कृपाल यांनी राष्‍ट्रीय जनता दल सोडून भाजपात गेले आहेत. यानंतर मला त्‍यांचे हात तोडावे असे वाटले.'

एवढेच म्‍हणून खासदार मीसा यादव थांबल्‍या नाहीत. त्‍या असेही म्‍हणाल्‍या की, 'राम कृपाल यादव आमच्‍या येथे चारा कापण्‍याचे काम करत होते. त्‍यांच्‍याविषयी आमच्‍या मनात सन्‍मान, आदर आहे. मात्र हा सन्‍मान तेव्‍हाच संपला जेव्‍हा त्‍यांनी सुशीलकुमार मोदी यांच्‍याशी हातमिळवणी केली. त्‍याचवेळी मला वाटले होते की, चारा कापण्‍याचे यंत्रानेच त्‍यांचे हात कापावे'.

राम कृपाल यादव पहिल्‍यांदा राष्‍ट्रीय जनता दलात होते. राम कृपाल यादव लालूंच्‍या जवळचे कार्यकर्ते होते. मात्र २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍याआधी लालूंच्‍या राष्‍ट्रीय जनता दलाला रामराम ठोकला आणि थेट भाजपात प्रवेश केला. त्‍यांना डावलून पाटलिपुत्रमधून लालूंची मुलगी मीसा यादव यांना उमेदवारी देणे हे कारण आरजेडी सोडण्‍याचे होते. २०१४ मध्‍ये भाजपने राम कृपाल यादव यांनी पाटलीपुत्रमधून उमेदवारी दिली होती. मीसा यादव यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.

मी या निवडणुकीत विजयी होणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. २०१४ मध्‍ये मला तयारी करता आली नव्‍हती, असे सभेदरम्‍यान मीसा यादव म्‍हणाल्‍या.




Post a comment

 
Top