0


नवी दिल्ली : 
केंद्र सरकारने काल सवर्ण वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण जाहीर केले होते. या निर्णयाचे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्वागत केले आहे. पण, हा एक पॉलिटिकल स्टंट असल्याचीही टीका त्यांनी केली. याचबरोबर त्यांनी एसी, एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण वाढवण्याचीही मागणी केली. 

मायावती यांनी केंद्राच्या सवर्ण वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर टीका केली. त्यांनी ‘केंद्राने घेतलेला हा निर्णय चांगला असला तरी तो घेण्यामागची सरकारची मनिषा चांगली नाही. हा एक पॉलिटिकल स्टंट आहे. हा निर्णय येत्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे.’ असे वक्तव्य केले. याचबरोबर त्यांनी इतर अल्पसंख्यांक गरीब लोकांनाही या आरक्षणाच्या कक्षेत घेण्याची मागणी केली. 
मायावती यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेवून केंद्र सरकारने एसी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण ५० टक्यापर्यंत वाढवण्याची मागणी केली. 

Post a Comment

 
Top