0
नवी दिल्‍ली :

राफेल विमान खरेदी प्रक्रियेवरुन काँग्रेस अधक्ष राहुल गांधींनी  गेल्‍या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतु, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्‍या टीकेमुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. पंतप्रधान एका महिलेच्या मागे लपत आहेत, असे वक्‍तव्य राहुल गांधींनी केले होते. त्‍यांच्या याच वक्‍तव्यावरुन राष्‍ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

वाचा : आरक्षण मिळतयं, पण नोकरीचं काय? : पाहा रेल्वेमधील नोकऱ्यांची 'भीषण' अवस्था!

राहुल गांधी यांनी एका रॅलीला संबोधीत करताना नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘‘राफेल मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी पळ काढत आहेत आणि बचावासाठी संसदेत एका महिलेला पुढे करत आहेत’ अशी टीका राहुल यांनी केली होती

Post a comment

 
Top