0
सोलापूर- चाैकीदार चोर है, १५ लाख रुपये आमच्या खात्यामध्ये आधी टाका, अशी मागणी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी साेलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवले. ताफ्यातील वाहनांच्या समोर जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलेच झाेडपून काढले. दरम्यान, प्रशासनाच्या दडपशाही धोरणाचा या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी आठ कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना सुरुवातीला काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रामलाल चौक परिसरात 'चौकीदार चोर है' च्या घोषणा दिल्या. काही अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले. एनएसयूआयचे गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार, सिद्धाराम सगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डफरीन चौक परिसरात एका कार्यकर्त्याने अचानक ताफ्यातील वाहनाच्या समोर जाण्याच्या प्रयत्न केल्याने संतापलेल्या पोलिसांनी थेट मारहाण केली. त्यामध्ये युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे यांना पोलिसांनी मारहाण केली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेविक विनोद भोसले यांना यांच्यासह काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बुधवारी सकाळीच ताब्यात घेऊन दुपारी तीन वाजता सोडून दिले.
Attack on the people who showed black flags to PM Modi

Post a comment

 
Top