0
शहा यांनी अबकी बार मानव अधिकार या हॅशटॅगसह व्हिडिओ शेअर केला. अशाच देशाचे स्वप्न पाहिले होते का असा सवाल त्यांनी केला

नवी दिल्ली - अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. मानवी हक्कासाठी काम करणारी संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या व्हिडिओमध्ये शहा यांनी देशातील लोकांना नवीन वर्षात संविधानातील मुल्यांसाठी भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. शाह म्हणाले, आज देशात द्वेष आणि अत्याचाराच नाच सुरू आहे आणि जे याच्या विरोधात आाज उठवतात त्यांचा आवाज छापे मारून आणि अकाऊंट सील करून दाबला जात आहे.


नसीर अॅमनेस्टीचे अॅम्बेसेडर आहेत. काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचलनालयाने अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या बंगळुरूमधील कार्यालयावर छापे मारले होते. नसिरुद्दीन शाह यांचे हे वक्तव्य बुलंदशहरमधील हिंसाचारावर त्यांच्या प्रतिक्रियेनंतर आले आहे. त्यावेळी त्यांनी मुलांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त केली होती.


संविधानाचा उद्देश सर्वांना न्याय देणे
नसीरुद्दीन शाह यांनी 'अबकी बार मानव अधिकार' हॅशटॅगसह व्हिडिओ शेअर करत विचारले की, अशाच देशाचे स्वप्न पाहिले होते का? संविधानाचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देणे हा असतो.


नसिरुद्दीन यांच्या या वक्तव्यावर अभिनेता इम्रान हाश्मी याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मी आता जो विचार करतोय तो मांडण्यास मी सक्षम आहे. मला वाटते आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मला वादाबाबत फार माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही.


संजय राऊत यांची रोखठोख भूमिका
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मला असे वाटत नाही की, भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. भारतात लोकशाही आहे. मी नसिरुद्दीन शहा यांचा आदर करतो. ते एक महान कलाकार आहेत. त्यांना जे म्हणायचे आहे तेच ते म्हणत आहेत.Naseeruddin Shah again attacked central government over situation in country

Post a Comment

 
Top