मुंबई :
संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवून द्या अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बंदमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हस्तक्षेप करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज यांच्या भेटीला कर्मचारी गेल्याने संपाला राजकीय वळण मिळाले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने मुंबईकरांचे हाल सुरूच राहिले.अधिक वाचा : बेस्ट संपावर उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार !
संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारीही संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे. कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत बेस्ट कृती समितीचे नेते व महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करून मार्ग काढणार आहेत. संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी राज ठाकरेंसमोर व्यथा मांडून प्रशासन धमकावत असल्याचा आरोप केला.
अधिक वाचा : बेस्ट संप सुरूच, शॉक मुंबईला अन् शिवसेनेलाही
संपामुळे बेस्टचे होणारे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन, बेस्ट प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बुधवारी कर्मचार्यांना बेस्टचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. या नोटीसीमुळे कर्मचार्यांचे कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे भोईवाडा व परळ येथे काहीकाळ नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकार्यांसमवेत कर्मचार्यांच्या कुटुंबियांनी वाद घातला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Post a Comment