सिडनी :
सलामीवीर रोहित शर्माने झुंजार शतकी खेळी करूनही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला. रोहितची १३३ धावांची खेळी संघाचा पराभव टळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या २८९ धावांच्या आव्हानासमोर भारताला ५० षटकांत ९ बाद २५४ धावांपर्यत मजल मारता आली.
आस्ट्रेलियाला दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था चौथ्या षटकांत ३ बाद ४ अशी झाली होती. सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायुडू लागोपाठ बाद झाले. अशा भीषण अवस्थेत सलामीवीर रोहित शर्मा आणि अनुभवी महेंद्रसिंह धोनीने डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी संघाला परत मार्गावर आणले होते.
धोनी आणि रोहितने सुरवातीला संयमी खेळी करत डाव सावरला. जम बसल्यानंतर दोघांनी फटकेबाजी सुरू केली. धोनीला बऱ्याच दिवसांनी सूर गवसला. धोनी अर्धशतकानंतर लगेच बाद झाला. धोनी परतल्यानंतर दिनेश कार्तिकला आक्रमकपणा नडला आणि विकेट फेकली. दिनेश पाठोपाठ जडेजाही स्वस्तात परतल्याने रोहितने एकहाती हल्ला कांगारूंवर चढवला. चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत गेल्याने मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित १३३ धावांवर बाद झाला आणि तेथेच भारताचा पराभव निश्चित झाला. रोहित बाद झाल्यानंतर भुवनेश्वरकुमारने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्नही अपूरे पडले.
तत्पूर्वी, उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी केलेल्या शानदार अर्धशतकानंतर पीटर हॅन्डस्कॉम्ब आणि स्टोनीसने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २८९ धावांचे आव्हान ठेवले. मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला फटकेबाजीला मुरड घालावी लागली, पण अखेरच्या १० षटकांत ९३ धावा कुटल्याने ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वरकुमारने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जडेजाला एक बळी मिळाला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. कर्णधार एरॉन फिंचची तिसऱ्याच षटकांत भुवनेश्वर कुमारने दांडी गुल करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. फिंच बाद झाल्यानंतर कॅरीला कुलदीपने माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर टाकले. त्यामुळे १० षटके पूर्ण होण्याआधीच आस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले.
त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्शने संघाचा डाव सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. एका बाजूने शानदार फलंदाजी करत ख्वाजाने अर्धशतक झळकावले. जडेजाने ख्वाजाला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर मार्शही अर्धशतक झळकावून ५४ धावांवर बाद झाला. त्याला कुलदीपने बाद केले. मार्शने बाद होण्यापूर्वी हॅन्डस्कॉम्बच्या साथीत पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.
हॅन्डस्कॉम्ब आणि स्टोनीस अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली. हॅन्डस्कॉम्बने शानदार फटकेबाजी केली. स्टोनीसनेही चांगली साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या १० षटकांमध्ये ९ च्या सरासरीने धावा करता आल्या. स्टोनीसला बढती मिळाल्याने मॅक्सवेलला चमक दाखवता आली नाही.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ५ बाद २८८ : ( उस्मान ख्वाजा ५९ - ८१ चेंडू ६ चौकार, शॉन मार्श ५४ - ७० चेंडू, ४ चौकार, पीटर हॅन्डस्कॉम्ब ७३- ६१ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, स्टोनीस नाबाद ४७ -४३ चेंडू, २ चौकार, २ षटकार, भुवनेश्वर कुमार २-६६, कुलदीप यादव २-५४, जडेजा १-४८) भारत ५० षटकात ९ बाद २५४ (रोहित शर्मा १३३-१२९ चेंडू, १० चौकार, ६ षटकार, धोनी ५१-९६ चेंडू ३ चौकार, १ षटकार, भुवनेश्वर कुमार २९ - २३ चेंडू, ४ चौकार, रिचर्डसन ४-२६, बेरहेनडॉर्फ २-३९)
------
भारताला जबर हादरा; शतकवीर रोहित बाद
भारताला विजयासाठी ३0 चेंडूत ७५ धावांची गरज
भारताला विजयासाठी ३६ चेंडूत ७६ धावांची गरज
भारत ४० षटकात ५ बाद १८४
सलामीवीर रोहितची झुंजार शतकी खेळी
भारताला पाचवा धक्का; विजयासाठी ११३ धावांची गरज
रोहितची शतकाकडे वाटचाल
भारताला विजयासाठी ८४ चेंडूत १३६ धावांची गरज
भारताच्या ३६ षटकात ४ बाद १५४ धावा
दिनेश कार्तिक मैदानात
भारताला चौथा धक्का; धोनी ५१ धावांवर बाद
धोनीचे ६८वे अर्धशतक
रोहित धोनीची भागीदारी, भारताचा डाव सावरला
रोहितचे एकदिवसीय सामन्यातील ३८वे अर्धशतक
महेंद्र सिंह धोनी आणि रोहित शर्मामध्ये ७३ धावांची भागीदरी
भारताच्या १५ षटकात ३ बाद ४४ धावा
ऑस्ट्रेलियाचे भारताला हादरे; ४ धावांमध्ये कोहली, धवन आणि रायुडू तंबूत
भारताला जबर धक्का; धवनपाठोपाठ विराट कोहली बाद
भारताच्या डावाला सुरुवात; धवन पहिल्याच षटकांत बाद
भारतासमोर ऑस्ट्रेलियाकडून २८९ धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाच्या २५० धावा पूर्ण; मॅक्सवेल मैदानात
ऑस्ट्रेलियाच्या ४५ षटकात चार बाद २२९ धावा
ऑस्ट्रेलियाच्या २०० धावा पूर्ण
४२ व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या २०० धावा पूर्ण
हॅन्डस्कॉम्ब आणि स्टोनीस मैदानात
ऑस्ट्रेलियाच्या ४० षटकांत ४ बाद १९५ धावा
कुलदीपने दाखवला शॉन मार्शला तंबूचा रस्ता
ख्वाजानंतर शॉन मार्शचेही अर्धशतक
ऑस्ट्रेलियाच्या ३५ षटकांत ३ बाद १७१ धावा
मार्शची अर्धशतकाकडे वाटचाल
ऑस्ट्रेलियाच्या ३० षटकांत ३ बाद १३८ धाव
मार्श आणि हॅन्डस्कॉम्ब मैदानात

ख्वाजा जडेजाची शिकार; ख्वाजा ५९ धावांवर बाद
ख्वाजा आणि शॉन मार्शची तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी
उस्मान ख्वाजाचे शानदार अर्धशतक
ऑस्ट्रेलियाच्या २५ षटकांत २ बाद ११६ धावा
ऑस्ट्रेलियाच्या २० षटकांत २ बाद ९१ धावा
उस्मान ख्वाजाचे शानदार अर्धशतक
ऑस्ट्रेलियाच्या १५ षटकांत २ बाद ६६ धावा
ख्वाजा २० तर, शॉन मार्श १० धावांवर नाबाद
ऑस्ट्रेलियाच्या १० षटकांत २ बाद ४१ धावा
भुवी आणि कुलदीपला प्रत्येकी एक बळी
ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका; कांगारुंचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले
ऑस्ट्रेलियाच्या ५ षटकांत १ बाद २४ धावा
उस्मान ख्वाजा (नाबाद २) आणि कॅरी (नाबाद १४) मैदानात
आस्ट्रेलियाला पहिला झटका; भुवीकडून एरॉनची दांडी गुल
ऑस्ट्रेलियाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी

Post a Comment