स्पा सेंटरच्या नावाखाली थाई युवतींकडून सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री विमानतळ पोलिसांनी छापा टाकून पाच थाई युवतींची सुटका केली.
ठळक मुद्दे
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय
विमानतळ पोलिसांनी केला पर्दाफाश
छापा टाकून पाच थाई युवतींची सुटका
ठळक मुद्दे
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय
विमानतळ पोलिसांनी केला पर्दाफाश
छापा टाकून पाच थाई युवतींची सुटका
विमाननगर (पुणे) - स्पा सेंटरच्या नावाखाली थाई युवतींकडून सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री विमानतळ पोलिसांनी छापा टाकून पाच थाई युवतींची सुटका केली. याप्रकरणी बंटिकुमार पटेल (वय २७) याच्यासह एका महिला एजंटला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील लि व्हिक्टोरिया स्पा अॅन्ड सलून येथे स्पाच्या नावाखाली पाच थाई युवतींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी एका महिला एजंटसह बंटिकुमार पटेल याला अटक करण्यात आली. पीडित थाई युवतींची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे. टुरिस्ट व्हिसावर या युवती पुण्यात आलेल्या होत्या. जास्तीचे पैसे देण्याच्या आमिशाने त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय सुरू होता. अधिक तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

Post a Comment