आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून जीवन जगले तर फायदा मिळेल.
- धावपळीच्या जीवनामध्ये संतुलन राखणे थोडे कठीणच जाते. मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून जीवन जगले तर फायदा मिळेल. त्यामुळे येथे सांगत असलेले नियम पाळले तर आयुष्य सुखी होईल.
1. वजनावर नियंत्रण
डब्ल्यूएचओने लठ्ठपणाचा आरोग्याच्या सर्वाधिक १० धोक्यांमध्ये समावेश केला आहे. यापासून बचाव करण्यासाठी व्यायाम किंवा योगा अवश्य करा. वेळीच लठ्ठपणावर नियंत्रण मिळवले नाही तर मधुमेह, हायपरटेन्शन, सांधेदुखी व वांझपणा इत्यादी समस्या होऊ शकतात.
2. रोज नाष्टा करा
दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. नाष्टा शरीराला आवश्यक ऊर्जा उपलब्ध करून देतो. याला दिवसाचे सर्वात महत्त्वाचे भोजन मानले जाते. नाष्ट्यासाठी वेळ मिळत नसेल तर ट्रेन, बस किंवा आपल्या गाडीमध्ये रस्त्यातच खाऊ शकता.
3. हेल्थ चेकअप
आपण पूर्णपणे फिट असल्याचे बहुतांश लोक म्हणतात. हेल्थ चेक-अपदेखील वेळेवर करणे खूप गरजेचे ठरते. अनेक आजारांची लक्षणे पहिल्या टप्प्यातच कळतात, परंतु तोपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यामुळे वेळीच मेडिकल टेस्ट करणे खूप आवश्यक आहे.
Post a Comment