0
पुणे महापालिकेचे २०१९-२० या वर्षाचे  कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केले.

महापालिका आयुक्तांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात स्थायी समितीने त्यात ४७३ कोटींनी  वाढ करत ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, चालू वर्षांत महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यामुळे २०१९-२० या वर्षाचे अंदाजपत्रक ६ हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा पार करणार का याबाबत उत्सुकता होती. मात्र आयुक्तांनी ५ हजार ८५ कोटींचे अंदाजपत्रक करीत हा टप्पा पार केला आहे.

आयुक्तांच्या बजेटमधील नवीन प्रकल्प व योजना :

*पालिकेच्या प्रकल्पांचे व योजनांचे त्रयस्त संस्थेमार्फत अवलोकन करण्याबरोबरच सामाजिक संस्थाकडूनही केले जाणार अवलोकन

*कामाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सामाजिक व परिणामकारक अवलोकन करण्यावर भर

*एचसीएमटीआर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार

*पीएमपीएमएल ताफ्यात ई- बस, सीएनजी व वातानुकूलीत बसचा समावेश होणार

*मेट्रो, प्रधानमंत्री आवास योजना, समान पाणीपुरवठा योजना, जायका प्रकल्प पूर्ण करण्यास विशेष प्रयत्न

*पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसाठी पुरेशा निधीची तरतूद

Post a Comment

 
Top