0
नवी दिल्ली :

केंद्र सरकारच्या तडकाफडकीच्या सक्तीच्या रजेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन पुन्हा रूजू झालेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांनी विश्वासू सहकाऱ्यांनाही एका दिवसात मुख्यालयात परत आणले. आलोक वर्मा येत्या ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. वर्मा तब्बल ७७ दिवसानंतर न्यायालयीन लढाई जिंकत मुख्यालयात काल (ता. ९) परतले. 
विशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना आणि आलोक वर्मा यांनी एकमेकांवर बेछूट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले. या सक्तीच्या रजेला आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका देत आलोक वर्मा यांना पुन्हा पदभार स्विकारण्यास सांगितले. दरम्यान त्यांच्याविरोधातील भ्रष्टाचार आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

 सीबीआयमधील संघर्षात डोवाल यांचा फोन टॅप?

सीबीआय संचालक आलोक वर्मा सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर अंतरिम संचालक म्हणून नागेश्वर राव यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली. नागेश्वर राव यांनी पदभार स्विकारताच विशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांची चौकशी करत असलेल्या पोलिस उप पोलिस अधीक्षक ए. के. बस्सी, पोलिस अधीक्षक एस. एस. गुर्म, पोलिस महासंचालक एम. के. सिन्हा आणि संयुक्त संचालक ए के. शर्मा यांची बदली केली होती.

 आलोक वर्मा यांना क्‍लीन चिट

संचालक आलोक वर्मा यांनी आता पदभार पुन्हा स्विकारताच त्या सर्व अधिकाऱ्यांची बदली रद्द करत पुन्हा सीबीआय मुख्यालयात आणले. वर्मा यांनी बदली रद्द करत केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्मा यांनी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा नसल्याचा दावा केला.   

Post a Comment

 
Top