0
राहुलच्या फ्लॅटमधून सोमवारी (ता.28) भांडणाचा मोठा आवाज येत होता, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई- मुंबईतील लोखंडवाला परिसरातील एका फ्लॅटमध्ये टीव्ही अभिनेता राहुल दीक्षित याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना बुधवारी (ता.30) उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी शेजारी राहाणार्‍या नागरिकांची चौकशी केली. राहुलच्या फ्लॅटमधून सोमवारी (ता.28) भांडणाचा मोठा आवाज येत होता, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे राहुलने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

सुसाइड नोट न सापडल्याने संशय बळावला...

मुंबई पोलिसांनी सांगितले की, ओशिवारा पोलिस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस यमुना नगरात पोहोचले. फ्लॅटमध्ये राहुल दीक्षितचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. राहुल हा तीन वर्षांपूर्वी जयपूरहून (राजस्थान) मुंबईत अॅक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी आला होता. पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. त्यामुळे राहुलची हत्या करून त्याला पंख्याला लटकविण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

दरम्यान, राहुल राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये राहणार्‍या नागरिकांची पोलिसांनी चौकशी केली. राहुलच्या फ्लॅटमधून सोमवारी रात्री उशीरापर्यंत पार्टीचा आवाज येत होता. नंतर भांडणाचा आवाज आल्याचेही आजुबाजुच्या लोकांनी सांगितले. राहुल आत्महत्या करू शकत नाही, असे त्याचे वडील मुकेश दीक्षित यांनी सांगितले आहे.
TV actor named Rahul Dixit found dead in his flat at mumbai

Post a comment

 
Top