नवी दिल्ली :
देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) राजपथावर परेड संचलन सुरू झाले आहे. यावेळी देशाचे शौर्य, सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडविण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्राने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'छोडो भारत' चळवळीचा देखावा साकारला आहे. त्यांचे संचलन राजपथावर होत आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना आमंत्रित केले आहे. सिरिल रामाफोसा आणि त्यांच्या पत्नी शेपो मोत्सेपे राजपथावरील मंचावर उपस्थित आहेत. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण आणि अन्य उपस्थित आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीसह देशात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
.

Post a Comment