0
निफाड:

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाडजवळ कादवा नदीपात्रात शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ट्रक कोसळला आहे. 

शुक्रवारी रात्री नाशिकहून निफाडकडे मालवाहू ट्रक येत असताना निफाडजवळ कादवा नदीपात्राच्या पुलावरुन ट्रक होता. यावेळी रात्री अकारा वाजता लोखंडी कठडे तोडून सुमारे ४० फूट खोल नदीपात्रात कोसळला. ट्रकचालकासह ट्रकमध्ये नेमके किती जण होते याचा अजून तपास लागला नाही. अपघात मध्यरात्री झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. नदीपात्रात पाणी असल्याने ट्रकचालक व क्लिनर अथवा इतर किती व्यक्ती त्यात होत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्‍थळी मदतकार्य सुरू असून निफाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कठडे तुटलेल्या ठिकाणावर बॅरिकेट बसवून वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

Post a Comment

 
Top