0
कोचर यांच्यावर व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहारांचा आरोप आहेत.
नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या विरोधात एफआयर दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. सीबीआय अधिकारी सुधांशू धर मिश्रा यांनी 22 जानेवारी रोजी ही कारवाई केली होती. आता सुधांशू यांना बँकिंग सिक्युरिटी अॅन्ड फ्रॉड सेल (बीएसएफसी) मध्ये रांची येथील आर्थिक गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जागी विश्वजीत दास यांना नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी दास कोलकातामध्ये सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचे एसपी होते.
CBI officer who filed FIR against Chanda Kochhar gets transfer order

Post a Comment

 
Top