0
कराड : 

मलकापूर (तालुका कराड जिल्हा सातारा) नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग चारमध्ये काँग्रेसच्या उमेदवार भारती दिलीप पाटील आणि भाजपाच्या उमेदवार अवंती रामचंद्र घाडगे यांना समान म्हणजे प्रत्येकी ६६२ मते मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी विजयी उमेदवार निश्चित करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिठ्ठी पद्धतीचा वापर करण्यात आला. 


यावेळी नशिबाची साथ काँग्रेसच्या भारती पाटील यांना मिळून त्यांच्या नावाची चिठ्ठी आराध्या जाधव हिने बाहेर काढली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी भारती पाटील यांना विजयी घोषित केले आहे.

 आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेत सत्ताधारी काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. काँग्रेसच्या १४ तर भाजपच्या ५ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार नीलम येडगे यांनी पिछाडी भरून काढत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सारिका गावडे यांच्यावर आघाडी मिळवली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच मलकापूर नगरपरिषदेत सत्ताधारी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक व  माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे गटाने बाजी मारली आहे.Post a Comment

 
Top