0
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहांना डुकराचा हा आजार कर्नाटकच्या शापामुळे झाल्याचे बेताल काँग्रेस नेते बीके हरीप्रसाद यांनी केले आहे. या विधानानंतर टीका झाल्यानंतर हरीप्रसाद यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी केलेल्या विधानाबद्दल मला अजिबात खेद वाटत नाही.

हरीप्रसाद यांनी नेमकं काय म्हटलंय ते वाचा

“ कर्नाटक सरकारला हात लावायचा प्रयत्न केल्यास त्यांना शाप लागेल. त्यांनी हात लावण्याचा अधिक प्रयत्न केल्याने त्यांची तब्येत आणखी खराब होईल. आमच्या अध्यक्षांबद्दलही ते वाईट बोललेत.

कर्नाटकमधअये जदसे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. भाजप हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात होता. 2 अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेणे, महाराष्ट्रातील मंत्री राम शिंदे यांनी कर्नाटकात 2-3 दिवसात सरकार बनवू असा दावा करणे यामुळे आरोपांना पुष्टी मिळाली होती

कर्नाटक विधानसभेची गेल्या वर्षी निवडणूक झाली होती. इथे 224 जागा असून भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. सत्ता स्थापनेसाठी 113 आमदारांची आवश्यकता आहे. भाजपने इथे  सत्तास्थापनेसाठी बरीच धडपड केली होती मात्र त्यांना यश आलं नाही. कर्नाटकात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जदसे (37 आमदार)आणि काँग्रेसने (80 आमदार) एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.






Post a Comment

 
Top