0
केंद्रात आणि राज्यामध्येही आता परिवर्तन होईल.

नांदेड- केंद्रात आणि राज्यामध्येही आता परिवर्तन होईल. त्यामुळे आता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान राहणार नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा चेहरा पाहण्याची लोकांची इच्छाच राहिली नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

नांदेड येथील महात्मा जोतिबा फुले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डी.पी. सावंत, मधुकर चव्हाण, अब्दुल सत्तार, वसंतराव चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, माणिकराव ठाकरे, संपतकुमार यांची या वेळी उपस्थिती होती.


देशात आता भाजप सरकारची उलट गिनती सुरू झाली आहे. फसवणुकीच्या राजकारणामुळे सामान्य माणूस, शेतकरी, तरुण हे सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. देशात सर्वच द्वेष, हिंसेचे वातावरण आहे. लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी व उद्योजकही नाखूश आहेत. सरकारचे चुकीचे धाेरण आणि निर्णयामुळे राज्यांमध्ये तसेच देशात परिवर्तन होईल. काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना करणारी भाजप आता दिसणार नाही, असा दावा त्यांनी या वेळी केला. रफाल प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना नरेंद्र मोदी उत्तर देऊच शकत नाहीत, असेही गहलोत यांनी सांगितले.

काँग्रेसच्या बाजूने वातावरण :
या वेळी खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, की देशात आता भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने वातावरण बदलत आहे. हे नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होते.

People are not interested to vote again PM Modi says CM Ashok Gohlat

Post a Comment

 
Top