तासगाव :
नियम आणि अटींच्या अधीन राहून डान्सबार सुरु करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कर्माची फळे आहेत असा आरोप दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी गुरुवारी तासगाव येथे पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी बारबालांच्या रोजीरोटीचा विचार करुन नये. राज्यातील तरुण पिढीचा विचार करावा असा टोलाही स्मिता यांनी यावेळी लगावला.

अधिक वाचा : छमछम होणार सुरू: डान्सबार संपूर्ण बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे स्मिता म्हणाल्या. डान्सबार बंद करण्यासाठी २०१६ साली केलेला कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर उतरुन डान्सबार विरोधात लढा उभारण्याचा इशारा स्मिता पाटील यांनी दिला.
स्मिता पाटील म्हणाल्या की, नवी मुंबईतील एका तरुणाने डान्सबार मध्ये उधळण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी आईचा निर्घृण खून केला होता. ही बातमी वाचून व्यथित झालेल्या आबांनी राज्यात डान्सबार बंदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी आबांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. कायदेशीर पातळीवर लढाई सुरु झाल्यानंतर अनेक अडचणीवर मात करत, प्रसंगी सभागृहात कायदा करुन आबांनी डान्सबार बंद ठेवले.
अधिक वाचा : डान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी
भाजप सरकारने मात्र हा विषय गांभिर्याने घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयात लढताना चांगला वकील सुध्दा दिला नाही. आबांच्या काळात आघाडी सरकारने ज्या ताकदीने खटला लढवला ती ताकद भाजप सरकारने लावली नाही. उलटपक्षी न्यायालयात खटला सुरु असताना सरकारने असंख्य डान्सबारना परवानगी दिली. डान्स बारवर बंदी यावी याबाबतीत सरकारचे धोरण उदासीन आहे. यामुळे राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होत आहेत.
आबांनी डान्सबार बंद केले तेव्हा बारबालांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आबांनी एक सर्व्हे केला होता. मुंबईतील डान्सबार बारमध्ये तब्बल ८० टक्के मुली बांग्लादेशी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. देशात घुसखोरी केलेल्या बारबालांच्या रोजीरोटीचा आपण विचार करण्याची गरज नसल्याचा विचार करुन आबांनी प्रयत्नांची पराकष्ठा करुन प्रसंगी वेळोवेळी कायद्यात बदल करुन डान्सबार बंद ठेवले होते, अशी आठवणही स्मिता यांनी यावेळी सांगितली.
Post a Comment