0
नवी दिल्‍ली :  

प्रियांका गांधी वधेरा यांनी अखेर अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांची काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्‍यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्‍या नियुक्‍तीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्‍याचबरोबर, चित्रपट इंडस्ट्रीत त्‍यांची चर्चा होत आहे. 'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्‍या निर्मात्‍यानंतर आता अभिनेत्री पायल रोहतगीनेदेखील प्रियांका यांच्‍यावर टिका केली आहे.
राजकीय क्षेत्रात प्रियांका यांच्‍यावर कॉमेंट्‍स येत असताना अभिनेत्री पायल रोहतगीने आपल्‍या ट्विटर अकाउंटवर प्रियांका गांधींवर कॉमेंट केली आहे. पायलने अनेक ट्‍विट्‍स केले आहेत. त्‍यापैकी एका ट्‍विटमध्‍ये पायलने लिहिलयं, 'लोक म्‍हणतात, पंतप्रधान बनण्‍यासाठी इंदिरा गांधी यांनी लाल बहादुर शास्त्री यांची हत्या केली. ते म्‍हणतात, इंदिरा यांनी आपला मुलगा संजय गांधी यांची हत्या केली आहे. ते म्‍हणतात, ती एक हुकूमशहा होती.'

प्रियांका गांधी इंदिरा यांचे दुसर रुप आहे. पायलने असे म्‍हणत पुढे लिहिलयं, 'आपणास आणखी एक हत्यारा, हुकूमशहा वा फॅसिस्ट हवाय? रक्‍त आणि मिळताजुळता चेहरा यामुळे एकसारखे गुणही असू शकतात.'

या ट्‍विटनंतर पायलवर सोशल मीडिया युजर्स भडकले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी पायल रोहतगीला ट्रोल करणे सुरू केले आहे. लोक तिच्‍या ट्‍विट्‍सवर वेगवेगळ्‍या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर पायलच्‍या या ट्‍विट्‍सचे विरोध होत आहे. पायलने आक्षेपार्ह ट्‍विट केल्‍याने ती ट्रोलर्सच्‍या निशाण्‍यावर आलीय.


 

Post a comment

 
Top