0
नाशिक :  

दिंडोरी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.


सध्या दिंडोरी मतदारसंघात भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे विद्यमान खासदार आहेत. शिवसेना भाजपात युतीचे संकेत मिळत आहे. जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाला जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महाले यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या भागात सेनेला भगदाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मतदारसंघातुन राष्ट्रवादी कडून इच्छुक असलेल्या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार या आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनमाड येथे आज छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंढे,  यांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'निर्धार परिवर्तन यात्रा' या कार्यक्रमात महाले हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

 
Top