मुंबई :
फिल्ममेकर प्रदीप सरकार आणि विद्या बालन ही हीट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्याची तयारी करत आहे. 14 वर्षांपूर्वी प्रदीप सरकार यांनी विद्या बालनसमवेत ‘परिणीता’ हा चित्रपट तयार केला होता. याच चित्रपटातून विद्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात केली होती. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विद्याने सैफ अली खानच्या आपोझिट काम केले होते. तरीही जोडी प्रेक्षकांना पसंद पडली होती.

सध्या असे समजते की, प्रदीप सरकारने आपल्या आगामी ‘बिनोदिनी दासी ऊर्फ नोती बिनोदिनी’ या चित्रपटासाठी विद्याला अॅप्रोच केले आहे. हा चित्रपट म्हणजे बायोपिकच असेल. बिनोदिनी ही 19 व्या शतकातील एक वेश्या होती. तत्कालीन कलाकार गिरीश चंद्र घोष यांनी बिनोदिनीमधील प्रतिभा ओळखली आणि तिला थिएटरमध्ये काम करण्याची ऑफर दिली. गिरीश यांच्या संपर्कात आल्यानंतर बिनोदिनीने वेश्या व्यवसाय सोडून थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुमारे एक दशकभर तिने कोलकातामधील प्रसिद्ध थिएटरमध्ये काम केले. हा चित्रपट बिनोदिनीशी झालेला विश्वासघात आणि तिच्या कथित शोषण यावर आधारित आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी प्रदीप सरकार यांनी विद्याला अॅप्रोच केल्याचे समजते. विद्याचा नैसर्गिक आवाज या भूमिकेसाठी योग्य असल्यानेच बिनोदिनीमध्ये विद्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Post a Comment