विटा :
सांगलीचे खासदार हे भाजपाचे कार्यकर्ते कधीच नव्हते आणि आजही नाहीत. आजही ते भाजपमध्ये सामावलेले नाहीत. ते माझ्याकडे ही येऊन जातात, असे धक्कादायक विधान शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. विट्यात पक्ष कार्यकर्त्यां समोर बोलताना रावते यांनी हे विधान केले.
रावते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खूप फरक आहे. अनिलभाऊ हे अत्यंत चांगले काम करीत आहेत. गेल्या वेळेला युती होती. आज यासंबंधी आपल्याला कल्पना नाही. युती होणार कि नाही यासंबंधी विचार न करता आपण ही निवडणूक लढवू असे रावते म्हणाले. यावेळी आमदार अनिलराव बाबर , जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, बजरंग पाटील, सतीश निकम, साहेबराव पाटील यांच्या सह आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment