0
'देशातल्या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या बळीराजाशी या सत्ताधाऱ्यांनी इमान राखलेलं नाही. त्यामुळेच आता यांना सत्तेत राहण्याचा अधिकार राहिला नाही'

बारामती, 18 जानेवारी : 'बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आश्वासनं द्यायची आणि नंतर त्याकडे ढुंकुनही पहायचं नाही हेच मोदीराज्य आहे,' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

'भाजपनं सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासनं दिली. त्याबद्दल विचारलं तर ते चुनावी जुमले होते असं सांगण्यात आलं. जनतेला आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यावर त्याकडे ढुंकुनही पाहायचं नाही हेच मोदीराज्य आहे,' असा घणाघात शरद पवार यांनी केला आहे.

'सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांशी इमान राखलेलं नाही'

'सध्याचं सरकार शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेत नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणंदेणं नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार त्याला मदत करत नाही. त्यामुळे देशातल्या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या बळीराजाशी या सत्ताधाऱ्यांनी इमान राखलेलं नाही. त्यामुळेच आता यांना सत्तेत राहण्याचा अधिकार राहिला नाही,' असं पवार म्हणाले.मोदी सरकारला शरद पवार का म्हणाले बेईमान?

Post a Comment

 
Top