0
जुबेर 7 ते 8 फूट उंच उडाला. एसजी विद्यालयाच्या भिंतीवरुन तो पलिकडे खाली पडला. जुबेर गंभीररित्या भाजला.
कोपरगाव- शहरातील एसजी विद्यालयासमोर जुबेर रशिद पठाण (वय-52) हा गॅसवरील फुगे विकत असताना मंगळवारी संक्रांतीच्या दिवशी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान गॅसटाकीचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जुबेर अक्षरश: 7 ते 8 फूट उंच उडाला व त्याचे शरीराचे तुकडे झाले. स्फोट झाल्यानंतर परिसरातील जनता हादरली व एकच खळबळ उडाली.
मिळालेली माहिती अशी की, गांधीनगर भागातील रहिवासी जुबेर रशिद पठाण एसजी विद्यालयाच्या भिंतीलगत कोपर्‍यावर गॅसवरील फुगे विकत होता. मंगळवारी संक्रांतीचा सण असल्यामुळे लहान मुले पतंगाबरोबर गॅसचे फुगे घेवून ते आकाशात सोडताना आनंद घेत असतात. दुपारी 12 वाजेच्यादरम्यान जुबेर हा गॅसचे फुगे विकत असताना टाकीचा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की, जुबेर 7 ते 8 फूट उंच उडाला. एसजी विद्यालयाच्या भिंतीवरुन तो पलिकडे खाली पडला. जुबेर गंभीररित्या भाजला. त्याच्या हनुवटीस टणक वस्तुचा फटका बसुन निम्मा चेहरा विदृप झाला. त्याच्या शरीरावरील मासाचे तुकडे इतरत्र पसरले. सदरचे ठिकाण हे वर्दळीचे असून राम मंदीर रोड व गांधीनगर रोड या चौकाला जोडले गेले आहे. घटना घडल्यानंतर क्षणभरात लोकांना काय झाले ते लक्षात येईन लोक सैरावैरा पळू लागले मदतीसाठी लोकांची धावाधाव सुरू झाली. परंतु या घटनेत फुगे विक्रेता जागीच ठार झाल्याने लोक विषन्न मनाने घटनास्थळ पाहत होते. जुबेरच्या मुलाने त्यांना नुकताच डबा आणून दिला होता व तो पाणी आणण्यासाठी तो बाहेर गेला तेवढयात सदर दुर्घटना घडली. अन्यथा मुलालाही या स्फोटाचा फटका बसला असता.

भयंकर अशा स्फोटात जुबेर पठाण याच्या शरीराचे तुकडे अक्षरश: गोळा करून ते ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी ग्रामिण रुग्णालयात नातेवाईकांची
व बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सदर गॅस टाकीत नायट्रोजनचा वायु भरलेला असतो. हा वायु अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍याने सांग‍ितले. सदर गॅस टाकीसंदर्भात सुरक्षिततेचे उपाययोजना करत नाहीत. यांना कुठलाही अधिकृत परवाना नसतो. सदरचा बळी हा निष्काळजीपणाचा म्हटला जात आहे. या घटनेवरुन नगरपालिकेने सदर फुगे विक्रेत्यांना काही निर्बंध घालणे गरजेचे बोलले जात आहे.

जुबेर याने कदाचित बिडी/सिगारेट पेटवली व त्याचा स्पर्श गॅसला झाला. त्यातून ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. तरीही नेमका स्फोट कशामुळे झाला याबद्दल निश्‍चित सांगता येत नाही. कोपरगांव शहर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...

Post a Comment

 
Top