0
मुंबई :

मुंबईमधील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही कायम राहिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे सांगत बेस्ट संपकऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारले. संपावर कायम राहून तडजोडीसाठी चर्चा योग्य नाही, असेही न्यायालयाने सांगत संपकऱ्यांना ठणकावले.

दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर सातव्या दिवशीही कोणताही तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. ही भेट फक्त पाच मिनिटांसाठी झाली. राज वर्षावर केवळ सात मिनीटे होते.

मनपा, बेस्ट आणि कामगार संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होऊनही संपावर कोणताच अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारकडून नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची मात्राही संपावर तोडगा काढू शकलेली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. राज यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना एकजूट राहण्याचा सल्ला दिला होता.

Post a Comment

 
Top