0
भोपाळ (मध्य प्रदेश) : रायसेन येथील एका घरात पोलिसांना ४ मृतदेह मिळाले असून एक पुरूष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची पत्नी, १२ वर्षाची मुलगी, ११ वर्षीय मेव्हणा, सासू हे मृतावस्थेत सापडले आहेत, अशी माहिती रायसेनचे साहाय्यक पोलिस अधीक्षक ए. पी. सिंह यांनी दिली.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, घरातून जखमी अवस्थेत मिळालेला व्यक्ती हा मृत महिलेचा पती आहे. या चारही जणांचा नेमका कशामुळे मृत्यू झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच असल्याचा  शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे.

दिल्लीतील बुराडीमधील अकराजणांच्या सामुहिक आत्महत्येप्रमाणेच मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Post a Comment

 
Top