0
तळमावले : 

तळमावले (ता. पाटण) येथील वाल्मिकी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिकणारी गुढे (ता. पाटण) येथील विद्यार्थिनी समृद्धी भरत कदम ही एसटी खाली सापडून जागीच ठार झाली.

मंगळवारी (दि.२२)  सकाळी सात वाजता कराड- ढेबेवाडी रस्त्यावर गुढे फाट्यानजीक हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थ्यांनी तळमावले येथील खाजगी क्लासला शिकण्यासाठी निघाली होती. ती एसटीमध्ये चढताना हा अपघात झाला.


Post a Comment

 
Top