0
खोटारड्या काँग्रेसकडून कर्जमाफीबाबत दिशाभूल : मोदी

नवी दिल्ली- राममंदिर उभारणीसाठी केंद्र सरकार अध्यादेश काढणार नाही. कोर्टाच्या निकालानंतर सरकार म्हणून जी जबाबदारी असेल ती पार पाडू, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी रा. स्व. संघ व विश्व हिंदू परिषदेचा दबाव असताना मोदींनी केलेल्या या वक्तव्याचे वेगळे महत्त्व आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी काँग्रेसवर आरोप केले. मंदिर सुनावणीत काँग्रेस अडथळे आणत असल्याचे ते म्हणाले. घटनेच्या चौकटीत तोडगा काढू, असेही ते म्हणाले. सुनावणीत अडथळे आणणाऱ्या आपल्या वकिलांना काँग्रेसने रोखावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मंदिर उभारणीचे आश्वासन सरकार पूर्ण करेल, अशी आशा संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केली. तर, नेते व न्यायालयाने जनभावनेचा आदर करावा, असे राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी म्हटले आहे. मोदी यांनी रफाल, संस्थांच्या स्वायत्ततेवरून उठलेले वादळ, सर्जिकल स्ट्राइक अशा मुद्द्यांवर भाष्य केले.

सर्जिकल स्ट्राइकसाठी गेलेल्या पथकाच्या संपर्कात होतो, शुभवार्तेसाठी आतुर होतो...
उरी सेक्टरमध्ये हल्ल्यानंतर पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइकसाठी गेलेले पथक पंतप्रधान मोदींच्या थेट संपर्कात होते. याबाबत पंतप्रधान म्हणाले, 'उरीतील नृशंस हल्ल्याबद्दल माझ्या मनात प्रचंड संताप होता. लष्कराला पूर्ण मोकळीक देऊन मी कारवाईची रूपरेषा मागितली. ही मोठी जोखीम होती. जवानांची सुरक्षा महत्त्वाची होती. जवानांना यासाठी गुप्त प्रशिक्षण देण्यात आले. अडचणींवर सखोल विचार करण्यात आला. मोहीम यशस्वी होवो अथवा नाही, सूर्योदयापूर्वी सर्व जवान परतले पाहिजेत, असे ठरले. या कारवाईदरम्यान मी थेट संपर्कात होतो. सकाळी अचानक संपर्क तुटला. सूर्योदय होऊ लागला तसा मी बेचैन होतो. जवानांचे प्राण महत्त्वाचे हाेते. सूर्योदयानंतर तासाभराने बातमी आली की आपल्या तुकड्या सुरक्षित परतल्या आहेत. यानंतर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक बोलावली. पाकिस्तानला याबाबत कळवल्यानंतर माध्यमांना माहिती दिली. मात्र, काहीही असले तरी या कारवाईबाबत राजकारण व्हायला नको.'

रफाल...
रफालवर राहुल गांधींचा हा दावा आहे की तुम्ही अनिल अंबानी यांना ऑफसेट काँट्रॅक्ट देण्यासाठी दबाव आणला. यावर तुम्ही काही उत्तर का देत नाही?
हे वैयक्तिक आरोप असतील तर कुणी, कुठे काय केले ते उघड करावे. संसदेत मी यावर सविस्तर उत्तर दिले. सुप्रीम कोर्टानेही क्लीन चिट दिली आहे. खरे तर स्वातंत्र्यानंतर संरक्षणविषयक करार वादग्रस्त का ठरले, यावर चर्चा व्हायला हवी. यात दलालांची का गरज होती? मी आरोप करणाऱ्यांपेक्षा लष्कराच्या गरजांचा विचार केला. जवानांचा जीव मला सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणून त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आरबीआय ऊर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. ६-७ महिन्यांपासून ते याबाबत बोलत होते.

ट्रिपल तलाक...
तीन तलाक अध्यादेशाला पुरोगामी म्हटले गेले आहे. मात्र सबरीमालात हा पुरोगामी विचार परंपरेत अडकला. दोन समुदायांबाबत हा विरोधाभास का?
तीन तलाक संप्रदाय वा आस्थेचा मुद्दा नाही. तो असता तर जगातील सर्व मुस्लिम देशांत लागू असता. तो आपल्यासाठी लैंगिक समानता व सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. परंपरेमुळे पुरुषांनाही काही मंदिरांत प्रवेश नसतो. सबरीमालावर निकाल देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या पीठातील एका महिला जजचा निकालही बारकाईने वाचला पाहिजे. त्यांचा निकाल इतर ४ जजपेक्षा वेगळा होता. त्यांनी अनेक मोलाच्या सूचना केल्या आहेत. कर्जमाफी बहुतांश शेतकरी सावकारांचे कर्ज घेतात. बँकिंग व्यवस्थेत ते नाहीत. कर्जमाफी हा काँग्रेसचा निवडणूक स्टंट आहे.

नोटबंदी आणि जीएसटी...
नोटबंदी व जीएसटीमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचे मानले जात आहे. नोटबंदीचा झटका गरजेचा होता? जीएसटीत त्रुटी राहिल्या?
नोटबंदी झटका नाही. वर्षभराआधीच सांगितले होते की, काळा पैसा उघड करा. उद्योगपती, व्यापारी, बाबूंच्या घरांत पोत्यांत नोटा सापडल्या होत्या. समांतर अर्थव्यवस्था देशाला पोखरत होती. नोटबंदी देशाला आर्थिक मजबुती देईल. जीएसटी सर्व पक्षांच्या सहमतीने लागू झाला होता. अनेक वस्तूंवर ३०-४०% पर्यंत कर होता. एकेकाळी ५०० पेक्षा जास्त वस्तूंवर प्रचंड कर लादलेला होता. मात्र आज त्यांच्यावर शून्य टक्के कर आहे. ईडी आम्ही ईडीचा दुरुपयोग करत नाही.सोहराबुद्दीन प्रकरणात कोर्टाचा निकाल वाचा. कळेल कुणी या संस्थांचा दुरुपयोग केला ते.

गोरक्षा आणि लिंचिंग...
गोरक्षेवरून जमाव हत्या करत आहेत. मुस्लिम स्वत:ला असुरक्षित समजत असल्याचे म्हटले जात आहे. नसिरुद्दीन शहाही बोलले. हे वातावरण का आहे?
अशा घटना निंदनीय आहेत. मात्र हे सर्व २०१४ नंतरच सुरू झाले का? हा समाजातील त्रुटीचा परिणाम आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. निवडणुकीआधीच टीका-टिप्पण्या काही लोकांचा अजेंडा असतात. मात्र चार कोटी कुटंुबांना वीज कनेक्शन देणे आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर देण्यासाठी आम्ही कुणाचाही धर्म पाहिला नाही. असे आरोप पूर्णपणे निराधार आहेत.

सर्जिकल स्ट्राइकवेळी जवानांना हाेते निर्देश...
मिशन यशस्वी होवोत अथवा न होवोत सूर्योदय होण्याआधी तुम्ही माघारी सुखरूप या. एकही जवान शहीद व्हायला नकाे. हाच पहिला निर्देश जवानांना हाेता. मी सूर्याेदयापर्यंत जवानांच्या संपर्कात हाेताे. जवान सुखरूप परत आले, या बातमीसाठी मी व्याकूळ हाेताे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मुलाखतीत सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या निर्णयासंदर्भात माेदी यांनी सांगितले की, उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आली. जवानांना जिवंत जाळण्यात आले. त्याचा प्रचंड राग माझ्या मनात होता. मी लष्कराला पूर्ण सूट देऊन अॅक्शन प्लॅन मागितला. त्यावर चर्चा झाली. दाेन वेळा तारखा बदलण्यात आल्या. हा खूप जाेखीमचा निर्णय हाेता. राजकीय नाही तर जवानांच्या जिवाची जोखीम हाेती. मला त्यांची पूर्ण सुरक्षा हवी हाेती. त्यांना गुप्त पद्धतीने प्रशिक्षण दिले गेले. सर्वांच्या कामांची वाटणी झाली. मिशन यशस्वी हाेवाेत किंवा अयशस्वी पण सूर्याेदयापूर्वी परत यायचा निर्णय झाला. कोणताही जवान शहीद व्हायला नकाे, हा पहिला निर्देश हाेता. मिशन सुरू असताना मी लाइव्ह काॅन्टॅक्टमध्ये हाेताे. सकाळी अचानक माहिती मिळणे बंद झाले. जस-जसा सूर्य वरती येऊ लागला मी जवान सुखरूप येण्याच्या बातमीसाठी व्याकूळ हाेऊ लागलाे. सूर्याेदयाच्या तासाभरानंतर बातमी आली की आमच्या दाेन, तीन तुकड्या सेफ झाेनमध्ये पाेहाेचल्या आहेत. शेवटचा व्यक्ती भारतीय हद्दीत परत येईपर्यंत मी माहिती घेतली. त्यानंतर कॅबिनेटची कमिटी ऑन सिक्याेरिटीची बैठक बाेलवली. पाकिस्तानला माहिती दिल्यानंंतर माध्यमांना माहिती दिली गेली. दरम्यान, उरी येथे १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २८ डिसेंबर २०१६ रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देत सर्जिकल स्ट्राइक करत या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला होता.

सरकारने सेनेच्या पराक्रमाचे गाैरव गान केले
सर्जिकल स्ट्राइकच्या राजकीयीकरणाच्या प्रश्नावर माेदी म्हणाले, सर्जिकल स्ट्राइकवर लष्कराने स्वत: माहिती दिली. परंतु काही राजकीय पक्षांनी त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या भाषेत अापली भाषा मिसळली. लष्कराबद्दल अपशब्द बाेलले. असे राजकारण नकाे हाेते. सरकारने तर लष्कराच्या पराक्रमाचे गाैरव गान केले.

एका युद्धाने पाकिस्तान सुधरणे अशक्य
सर्जिकल स्ट्राइकनंतर दहशतवादी कारवाया सुरू असल्याच्या प्रश्नावर माेदी म्हणाले, एका युद्धामुळे पाकिस्तान सुधरू शकत नाही. १९४७, १९६५ मध्येही युद्ध झाले हाेते. आता रणनीतीवर चर्चा करणे याेग्य नाही. परंतु पाकिस्तानला सुधारण्यास वेळ लागेल. पाकिस्तानशी चर्चा करण्यास भारताचे काेणतेही सरकार तयार आहे. परंतु दहशतवाद बंद व्हायला हवा.
Some important points from interview of PM Modi to a news Channel

Post a Comment

 
Top