0
बीड :
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्या स्वप्नाचा एकेक शब्द मी योजनेत बदलला. त्यांच्या पुण्याईमुळेच आज जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढत आहे, असे सांगून लोकनेते मुंडे यांनी मला सर्व मैदानातील लढाईचे धडे दिले आहेत. यामुळे शून्यावर बाद होणारी खेळाडू मी नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.


नांदेड - बंगळूर एक्स्प्रेसला घाटनांदूर येथे थांबा मिळावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी होती. पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्यामुळे ही मागणी पूर्ण झाली. या भगिनींनी घाटनांदूर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेले विकासाचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मागील २५ वर्षात आला नसेल एवढा निधी दिला, आता पुढच्या २५ वर्षांचे नियोजन मला करायचे आहे. जिल्ह्याला विकासाचे वैभव प्राप्त करून दिले, ही सर्व मुंडे साहेबांची पुण्याई आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या नावाचे राजकारण करणारांच्या मागे जावू नका तर त्यांचे नांव जिवंत ठेवणारांच्या मागे खंबीरपणे उभा रहा. मुंडे साहेबांनी मला प्रत्येक मैदानात लढण्याची ट्रेनिंग दिली आहे, मी शुन्यावर बाद होणारी खेळाडू नाही. तुमच्या विश्वासाच्या बळावर निवडणुकीचे मैदानही जिंकेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a comment

 
Top