पटसंख्येच्या तुलनेत लसीकरणाला विद्यार्थ्यांची संख्या कमी
जळगाव - गाेवर व रूबेला लसीकरणाच्या निमित्ताने खासगी शाळांमधील वस्तुस्थिती समाेर येईल. बाेगस पटसंख्या नाेंदवून शासकीय याेजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थाचालकांनी केलेली धूळफेक उघड हाेणार आहे. लसीकरणासंदर्भात आढावा सुरू झाल्याने आता पटसंख्या व प्रत्यक्षातील लसीकरण यात माेठी तफावत आढळून येत असल्याने शाळा प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
पाेलिओ पाठाेपाठ रूबेला व गाेवर या आजारांना हद्दपार करण्यासाठी देशभरात लसीकरण माेहीम राबवण्यात येत आहे. फेब्रुवारीपर्यंत ही माेहिम पूर्ण करून शाळां तसेच शाळाबाह्य मुलांना शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट डाेळ्यासमाेर ठेवले आहे. दरम्यान, शहरातील २३५ शाळांमध्ये रूबेला लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. शाळांनी पालिका प्रशासनाकडे नाेंदवलेल्या पटसंख्येच्या तुलनेत लसीकरणासाठी हजर विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यचे समाेर येत आहे.
शहरात ७४ टक्के लसीकरण
शहरात एकूण २३५ शाळा आहेत. उर्दू वगळता अन्य माध्यमांच्या १९६ शाळांमध्ये ८६ हजार ९५७ पैकी ७४ हजार ४५५ विद्यार्थ्यांना लसीकरण केले आहे. शहरात शाळाबाह्य मुलांसह विद्यार्थी संख्या १ लाख ३२ हजार ४०४ असून ७४ %लसीकरण झालेे आहे.
मुस्लिमबहुल भाग अन् उर्दू शाळांमध्ये अत्यल्प प्रतिसाद
महिनाभरापासून सुरू असलेल्या लसीकरण माेहिमेत मुस्लिम बहुल भाग तसेच उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. शहरात उर्दू माध्यमाच्या ४० शाळा आहेत. त्यात १७ हजार ७७४ विद्यार्थी आहेत. त्यापैकी केवळ ४ हजार १३४ विद्यार्थ्यांनाच लसीकरण करण्यात आले आहे. हा आकडा केवळ २३ टक्के आहे. त्यामुळे उद्यापासून आयुक्त डांगे हे स्वत: शाळांना भेटी देणार आहेत.
नगरसेवकांची घेतली बैठक
मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात तसेच उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये लसीकरण करून घेतले जात नसल्याने आयुक्त डांगे यांनी गुरुवारी मुस्लिम नगरसेवकांची बैठक घेतली. तसेच मशिदीत यासंदर्भात माैलानांच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे.

Post a Comment