0
जळगाव- सिंधी कॉलनीतील २१ वर्षीय युवकाने स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
नीलेश मेरूमल मंधान (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ मयूर मंधान हा हॉकर्स आहे. तो गोलाणी मार्केटमध्ये फुटपाथवर कपडे विकण्याचे काम करतो. नीलेश हा भावाच्या लोडगाडीवर काम करीत होता. प्रकृती बरी नसल्याचे कारण भावाला सांगून तो घरी आलेला होता. तो झोपलेला असताना वडील घराबाहेर गेले होते. घरात कुणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील सिंधी कॉलनीत नाश्त्याची गाडी लावतात. ते घरी परत आल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नीलेश याला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या वेळी रुग्णालयात हॉकर्सनी गर्दी केली होती. भांडण वैगेरे झाले नव्हते. मी बाहेर गेलो, त्यावेळेस तो घरात झोपलेला होता. त्याने नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हेच कळले नाही, असे त्याचे वडील मेरूमल यांनी सांगितले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Young boy committed suicide

Post a Comment

 
Top