0
आरोपीने मृतांना भर रस्त्यात ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर- चंदपूर शहरातील बायपास रोडवरील अष्टभुजा परिसरातील रमाबाई नगर येथे दोन भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. सोनू साव (२८) आणि गुड्डू साव (३२) अशी मृतांची नावे असून हे दोघे रमाबाई नगरमध्ये राहत होते.

या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. आरोपीने मृतांना भर रस्त्यात ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Two brothers killed in the streets of Chandrapur

Post a Comment

 
Top