0
मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सरकारकडून सुरक्षा कमी करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावरून राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, आव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

आव्हाड यांना ज्या दजार्ची सूरक्षा दिली आहे, ती निवडणुकीच्या तोंडावर कमी करणे ही गंभीर बाब आहे. आव्हाड यांना सनातनपासून धोका आहे. हे सरकारनेही मान्य केले आहे. तरीही त्यांची सुरक्षा कमी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. राज्य सरकार नेत्यांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करत असेल तर ते निदर्शनास आणून दिले जाईल, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड हे नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेले आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पागारकर आणि अविनाश पवार यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली होती. असे असतानाही आव्हाड यांची सुरक्षा कमी केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Post a Comment

 
Top