0
एमआयडीसीतील राजीव नगरातील कुख्यात गुंड रणजीत लडी याला आणि त्याच्या एका साथीदाराला परिसरातील लोकांनी बेदम मारहाण केली.

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात नववर्षाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांची ह त्या करण्‍यात आली आहे. यात एका गुंडाचा समावेश आहे.

मिळालेली माहिती अशी की, पहिली घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी घटना इमामवाडा परिसरात घडली आहे. एमआयडीसीतील राजीव नगरातील कुख्यात गुंड रणजीत लडी याला आणि त्याच्या एका साथीदाराला परिसरातील लोकांनी बेदम मारहाण केली. यात रणजीत लडीचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना 31 डिसेंबरला रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली.

दुसरी घटना इमामवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत जाटतरोडी मध्ये घडली. आकाश वाघमारे या तरुणाची तीन ते चार लोकांनी हत्या केली. ही हत्या देखील सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या वादातून करण्यात आल्याचे समजते. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
Two Murder In Celebration New Year In Nagpur

Post a Comment

 
Top